फक्त मुद्द्याचं!

18th April 2026
पिंपरी-चिंचवड

महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांना अभिवादन!

महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांना अभिवादन!

पिंपरी : थोर क्रांतिकारक तसेच हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते, चिंचवड गावातील चापेकर बंधु अशाच थोर हुतात्मांपैकी होते. क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर आणि त्यांचे बंधू वासुदेव व बाळकृष्ण यांच्या बलिदानामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा मिळाली आणि देशभक्तीची ज्योत अधिक प्रखर झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या इतिहासात चापेकर बंधूनी देशासाठी दिलेले योगदान देशवासियांना सतत प्रखर देशभक्तीची प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतीवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर बंधुंच्या समूह शिल्पास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

या अभिवादन प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षेनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्य सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आणि कर्मचारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"