फक्त मुद्द्याचं!

25th April 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून घरपोच मालमत्ता कर बिल वाटपाला सुरुवात!

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून घरपोच मालमत्ता कर बिल वाटपाला सुरुवात!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी मालमत्ता कर बिलांचे घरपोच वाटप महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकापर्यंत कर बिल वेळेत पोहोचविण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून, बिल वाटपासाठी येणाऱ्या महिलांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र तसेच मोकळ्या जागांसह सुमारे ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मिळकती आहेत. मालमत्ता सर्वेक्षणातून नव्याने सापडलेल्या मिळकतींची नोंदणी सुरू असून, एकूण मिळकतींची संख्या ८ लाखांपर्यंत होण्याची शक्यता आहे. या सर्व मिळकतींच्या कर देयकांचे वितरण महिला बचत गटांमार्फत घरोघरी करण्याची कामकाज महापालिकेने महिला आर्थिक विकास महामंडळ यांना दिलेले आहेआहे. गेल्या तीन वर्षांत महिलांनी ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.

कर आकारणी व कर संकलन विभागाने यावर्षी पर्यंत सर्व देयकांचे वितरण पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याबाबत जप्तीपूर्वीची नोटीस देयकासोबत दिली जाणार असून, त्यामुळे नागरिकांना वेळेत कर भरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच महिला बचत गटांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, करासंदर्भातील माहिती देणे आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणे अशी कामेही केली जाणार आहेत.

या उपक्रमातून महिला सक्षमीकरणालाही चालना मिळत आहे. समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गट फेडरेशनच्या ६०० हून अधिक महिलांमार्फत ही मोहीम राबवली जात आहे. तसेच, ‘सिद्धी’ अ‍ॅपच्या माध्यमातून मालमत्ताधारकांना घरपोच बिल वितरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीमुळे वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शक, वेगवान आणि सुलभ झाली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"