फक्त मुद्द्याचं!

24th April 2026
गुन्हेगारी

तडीपार गुन्हेगारास अटक ;शस्त्रसंधीचा भंग!

तडीपार गुन्हेगारास अटक ;शस्त्रसंधीचा भंग!

पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द, पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार केलेला गुंड विनापरवाना आदेशाचा भंग करून सार्वजनिक रस्त्यावर हातात लोखंडी कोयता घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून ही कारवाई गुरुवार 23 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास ठक्कर डायनिंग हॉल, बांधकाम चालू असलेल्या इमारती जवळ ,ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे करण्यात आली.

viara vcc
viara vcc

विकास जनार्दन रेड्डी पोलीस शिपाई, निगडी पोलीस ठाणे, यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आयुब चमन खान (वय 28, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, अंकुश चौक, निगडी असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या आदेशानुसार आरोपीस 28 नोव्हेंबर 2025 पासून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द, पुणे शहर व पुणे ग्रामीण हद्दी मधून तडीपार करण्यात आले आहे .आरोपीने महाराष्ट्र शासन अगर पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांची कोणतीही परवानगी न घेता तडीपार आदेशाचा भंग केला आहे. शहरात शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून सार्वजनिक रस्त्यावर हातात लोखंडी कोयता बाळगून उभा असल्याच्या स्थितीत मिळून आला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार वीर हे तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"