11 लाख 65 हजार चारशे रुपये किंमतीचे मॅफेड्रॅानअमली पदार्थ जप्त!

तीन जणांना अटक
पिंपरी :एमडी मॅफेड्रॅानअमली पदार्थ अकरा लाख 65 हजार चारशे रुपये किमतीचे 116 ग्रॅम 54 मिलिग्रॅम वजनाचा अमली पदार्थ वाहतूक करताना तीन जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवार 22 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दक्षिण महाळुंगे एमआयडीसी हद्दीतील खांलुम्ब्रे ता. खेड येथे करण्यात आली.

याप्रकरणी विजय दीपक दौंडकर पोलीस हवालदार, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिशुपाल धनाराम चौधरी (वय 25, रा. खालुम्ब्रे, ता. खेड, जि पुणे, मूळ – रा. पोटलिया, ता सुजन, जि. पाली, राजस्थान), रामदिन भवरलाल चौधरी (वय 24, खालुम्ब्रे ,ता. खेड ,मूळ – राम आसनी, ता. भिलाडा, जोधपुर, राजस्थान), प्रवीण मल्हार चौधरी (वय 22, रा. वडगाव, मावळ, पलाझो ग्रीन सोसायटी, फ्लॅट नंबर 704, ता. मावळ, मुळगाव- हुंडो का बास, हरीयाद, ता. भिलाडा, जि. जोधपुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय मांगीलाल चौधरी, नरेश चौधरी हे फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक व दोन यांनी त्यांच्या ताब्यात एकूण 11,65,400 किंमतीचा 116 ग्रॅम 54 मिलिग्रॅम वजनाचा एमडी मॅफेड्रॅान हा अमली पदार्थ संगणमत करून बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता वाहतूक करताना आढळून आला .त्यांच्याकडून एक मोटरसायकल, तीन मोबाईल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पाऊच व स्टील चमचासह एकूण 13 लाख 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. एमडी हा अमली पदार्थ आरोपी क्रमांक तीन याच्याकडून विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जायभाये हे पुढील तपास करत आहेत.

