फक्त मुद्द्याचं!

25th May 2026
महाराष्ट्र

मागील दहा दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ!

मागील दहा दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ!

पेट्रोल आणि डिझेल मध्ये प्रति लिटर 25 ते 30 रुपयांची वाढ होण्याची शक्यता?
नवीदिल्ली : मागील दहा दिवसात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेल मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलची 2 रुपये 61 पैसे प्रति लिटर तर डिझेलची 2 रुपये 71 पैसे प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसात पेट्रोल प्रति लिटर 7 रुपये 35 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 7 रुपये 53 पैसे महाग झाले आहे. चौथ्यांदा इंधन दरवाढ तेल कंपन्यांनी केल्याने वाहतूक खर्च प्रचंड वाढून याचा थेट परिणाम महागाईवर होणार आहे.

viara vcc
viara vcc

इराण ,अमेरिका आणि इस्त्राईल यांच्या वाढत्या संघर्षामुळे जगभरात इंधनपुरवठा कमी झाला आहे. तेल दरात प्रति बॅरल मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना दररोज 1380 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. कंपन्यांचे आर्थिक गणित सुधरविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर 25 ते 30 रुपये अशी मोठी वाढ करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या तेल कंपन्यांनी पहिली दरवाढ 15 मे रोजी सुमारे तीन रुपये पेट्रोल आणि तीन रुपये 11 पैसे डिझेल वाढ केली. त्यानंतर 19 मे रोजी पेट्रोल 90 पैसे आणि डिझेल 90 पैसे आणि आता 25 मे रोजी पुन्हा एकदा लक्षणीय वाढ झाली आहे. चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध, फळे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीवर होऊन महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पेट्रोल आणि डिझेल मध्ये प्रति लिटर 25 ते 30 रुपयांची वाढ होण्याची शक्यता?
आज पर्यंत चार वेळा केलेली इंधन दरवाढ ही अत्यल्प असून नजीकच्या काळात इंधनाचे दर आणखीन भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय तेल कंपन्यांचा इंधन खरेदी विक्रीचा दररोजचा तोटा अंदाजे 1380 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रति लिटर 25 ते 30 रुपयांची वाढ होण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. आगामी काळात हे नुकसान कायम राहिल्यास इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपेट्रोल डिझेलच्या किंमतीतपन्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच गंभीर होऊ शकते .सतत तोटा सहन केल्यास या कंपन्यांची भांडवल क्षमता संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इंडियन ऑइल कंपनीला प्रति बॅरल चार डॉलर्स आणि भारत पेट्रोलियमला प्रति बॅरल आठ डॉलरचे नुकसान सध्या होत आहे. विशेष म्हणजे ही दरवाढ होण्याअगोदर या तिन्ही कंपन्या प्रति बॅरल 12 ते 14 डॉलरचा नफा मिळवत होत्या.

घरगुती एलपीजी सिलेंडर महागणार
तेल कंपन्यांना डीजेल आणि पेट्रोल याबरोबरच घरगुती एलपीजी सिलेंडरवर देखील तोटा सहन करावा लागतो. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या व्यवस्थापनाने नुकत्याच एका विश्लेषकांसोबत झालेल्या चर्चेत सांगितले की, कंपनीला सध्या घरगुती वापराच्या एका सिलेंडर मागे 670 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे .त्यामुळे पेट्रोल ,डिझेल दरवाढीनंतर आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात भडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"