फक्त मुद्द्याचं!

11th June 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापनदिन साजरा!

पिंपरी चिंचवड कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापनदिन साजरा!

पिंपरी : पिंपरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचा २७ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात आणि तितक्याच भावुक वातावरणात साजरा करण्यात आला. खराळवाडी, पिंपरी येथील शहर (जिल्हा) मध्यवर्ती पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

viara vcc
viara vcc

ध्वजारोहण सोहळ्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना शहराध्यक्ष योगेश बहल भावुक झाले होते. आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले,”आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मनाला अतिशय वेदना होत आहेत. आपले मार्गदर्शक आणि अष्टपैलू नेते अजितदादा पवार आज आपल्यात नाहीत, ते काळाच्या पडद्याआड गेले आहेत, हे दुःख आपण अद्यापही पचवू शकलेलो नाही. दादांची उणीव प्रत्येक क्षणाला भासत आहे. गेल्या २७ वर्षांत दादांनी तळागाळातील सामान्य कार्यकर्त्यांचे एक मजबूत जाळे निर्माण केले, त्यांना ताकद दिली आणि पक्षाला देशपातळीवर पोहोचवले. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात आणि पुरोगामी प्रगतीत त्यांचे योगदान अतुलनीय आणि ऐतिहासिक राहिले आहे.”योगेश बहल यांनी पुढे बोलताना अजितदादांच्या कामाच्या पद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले,

अजितदादांसारखा लोकनेता पुन्हा होणे अशक्य आहे. सामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात अहोरात्र धावून जाणारे, शिस्तबद्ध, कडक प्रशासक आणि तितकेच पारदर्शक व परखड नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्राच्या विकासाचा कणा म्हणून जनता नेहमीच त्यांच्याकडे पाहत आली आहे. या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधत, दिवंगत अजितदादांनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी अत्यंत सक्षमपणे व धैर्याने पक्षाची धुरा सांभाळली असल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. आदरणीय सुनेत्रावहिनी आणि युवा नेतृत्व खासदार पार्थदादा पवार यांना अजितदादांसारखेच अथांग जनकार्य करण्याचे बळ लाभो आणि त्यांच्या कामाला दादांसारखीच गती व ऊर्जा मिळो, अशी कामना व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या २७ वर्षांच्या गौरवशाली प्रवासात अहोरात्र कष्ट घेणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला यावेळी पक्षाच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमा वेळी सेवादल कार्यकारिणी मध्ये मुख्य सचिवपदी नजीर पटेल, शहर मुख्य संघटकपदी गुलामअली भालदार, सेवादल शहर उपाध्यक्ष मंगेश थिटे यांची नियुक्ती करण्यात आली.

या कार्यक्रमास, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते भाउसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, तानाजी खाडे, युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष कैलास बारणे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, नगरसेविका वैशाली घोडेकर, भीमाताई फुगे, संगीता ताम्हाणे, निकिता कदम, वर्षा जगताप, उज्वला ढोरे, दीप्ती कांबळे, प्रतीक्षा जवळकर, सारिका मासुळकर, प्रियांका कुदळे, योगिता बारणे, आशा शेंडगे, नगरसेवक विराज लांडे, यश साने, शेखर चिंचवडे, अनंत कोऱ्हाळे, राजू बनसोडे, मा.नगरसेवक पंडित गवळी, सतीश दरेकर, प्रकाश सोमवंशी, ॲड.गोरक्ष लोखंडे, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, शेरबहादूर खत्री, बंन्सीपारडे, सेवादल प्रदेश मुख्य संघटक प्रमोद साळवे, ओबीसी प्रदेश कार्याध्यक्ष सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, दीपक साकोरे, संजय औसरमल, प्रशांत महाजन, रविंद्र ओव्हाळ, अकबर मुल्ला, विनोद वरखडे, युवराज पवार, संग्राम चव्हाणविनोद वरखडे, मनीषा गटकळ, श्रीकांत कदम, प्रदिप आवटी, रशीद सय्यद, शक्रुल्ला पठाण, कविता खराडे, संगीता कोकणे, तुकाराम बजबळकर, राजेंद्रसिंग वालिया, सेवादल सेलचे प्रविण पिंजण, अभिजीत आल्हाट, अलंकार हिंगे, बाबासाहेब चौधरी, नजीर पटेल, मंगेश थिटे,सुनिल अडागळे इत्यांदीसह अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे आणि सेवादलाच्या सर्व पदाधिकारी यांनी केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"