Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

चांगला परतावा देण्याचे आमिष;5 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक!

चांगला परतावा देण्याचे आमिष;5 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 5 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 27 जुलै ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी बी 17, तिसरा मजला भोंडवे एम्पायर, शिंदे वस्ती रोड, रावेत येथे ऑनलाइन घडली.

याप्रकरणी विशाल मुकुंद नारखेडे (वय 38, फ्लॅट नंबर बी 17, तिसरा मजला भोंडवे एम्पायर, शिंदे वस्ती रोड, रावेत, मूळ – रा. निमखेड, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात महिला, बंधन बँक खातेदार, सेंट्रल बँक खातेधारक, बँक ऑफ इंडिया बँक खातेधारक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी ज्युलियस बाईर हेल्प अँड सपोर्ट Y1119 या व्हाट्सअप ग्रुप वर जाहिरात करून ग्रुप वरील अज्ञात मोबाईल वरून शेअर मार्केटमध्ये गुंतवणीच्या नावाखाली चांगला परतावा देण्याचे अमिष दाखवले. विविध शेअरच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक अकाउंट वर एकूण 5 लाख 38 हजार रुपये भरण्यास भाग पाडून सदर रकमेचा अपहार करून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. रावेत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खैरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

पिस्तूल विक्री प्रकरणी तरुणास अटक!
पिंपरी : बेकायदेशीरपणे पिस्तूल विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार 18 ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास स्वामी मेडिकल समोर वराळे रोड येथे करण्यात आली.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत रावण यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .अजय भीमराव जाधव (वय 25, रा. धामणे, ता. खेड) आणि एका अल्पवयीन बालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सुरक्षेचे नियम मोडून बेकायदा शस्त्र बाळगले होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने त्याच्याकडील पिस्तूल एका अल्पवयीन मुलाला दिले होते. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलांकडून पिस्तूल जप्त केले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"