Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

12th September 2026
गुन्हेगारी

चॅटिंग आणि फोटो प्रकरण मिटविण्यासाठी खंडणीची मागणी;एकास अटक!

चॅटिंग आणि फोटो प्रकरण मिटविण्यासाठी खंडणीची मागणी;एकास अटक!

पिंपरी : माझ्या बहिणीला केलेले इंस्टाग्राम वरील चॅटिंग आणि फोटो अद्याप पर्यंत माझ्याकडे असून हे प्रकरण तुला मिटवायचे तर आणखीन पैसे द्यावे लागतील मी काळेवाडीतील भाई आहे .येत्या दोन दिवसात पैसे नाही दिले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी एका तरुणाला देण्यात आली. ही घटना जुलै ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

viara vcc
viara vcc

विराज गोपाळ कुटे (वय 21, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम लक्ष्मण निवेकर (वय 19, रा. शिवराजनगर कॉलनी नंबर दोन, भारत गॅस काळेवाडी), हर्षवर्धन बलभीम आयवळे (वय 21, रा. शिवराज नगर कॉलनी नंबर दोन, भारत गॅस काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे असून आरोपी क्रमांक दोन हर्षवर्धन आयवळे यास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा लहान भाऊ संग्राम गोपाळ कुटे याला आरोपी क्रमांक एक याने तू माझ्या बहिणीला इंस्टाग्राम वर केलेले चॅटिंग व तुमचे फोटोचे पुरावे माझ्याकडे असून तुझ्याविरुद्ध माझ्या घरच्यांनी पोलिसात तक्रार करू नये म्हणून 30 लाख रुपये मला द्यावे लागतील. पैसे न दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही अशी वेळोवेळी धमकी देऊन आरोपी नंबर एक याने फिर्यादीच्या लहान भाऊ संग्राम कुटे यांचे कडून जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 13 लाख रुपयांची खंडणी घेतली आहे.

18 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ कामानिमित्त पिंपळे सौदागर गावात गेला असता आरोपी क्रमांक एक अचानक त्याच्या समोर येऊन म्हणाला की, तू मला ओळखलेस का? मी शुभम निवेकर काळेवाडीतील भाई आहे. याची मी तुला परत आठवण करून देतो. मी तुलाच शोधत होतो. तु 2024 मध्ये माझ्या बहिणीला केलेले इंस्टाग्राम वरील चॅटिंग आणि फोटो अद्याप पर्यंत माझ्याकडे आहेत. हे प्रकरण तुला कायमचे मिटवायचे असेल तर आणखीन पैसे द्यावे लागतील .अन्यथा तुला येणाऱ्या दोन दिवसात जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. सांगवी पोलीस ठाण्याचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, खंडणी पथक पोलीस उपनिरीक्षक जावळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"