Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

घरफोडी करणाऱा सराईत गुन्हेगार जेरबंद!

घरफोडी करणाऱा सराईत गुन्हेगार जेरबंद!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपीकडून 4 लाख 24 हजार 478 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . उत्तम प्रकाश गाढवे (वय 36, माणिक नगर, पोते वस्ती, येरवडा ,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

viara vcc
viara vcc

पोलासांनी दिलेल्या माहितीनुसार दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट तीन कडून समांतर तपास सुरू होता. पथकाने परिसरातील शंभरहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर सापळा रचून बोपखेल फाटा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून द2 लाख 28 हजार 410 किंमतीचे 70 फ्लॅश वॉल पितळी, 67 हजार 68 रुपये किंमतीचे 27 ड्रायव्हर पितळी, 54 हजार रुपये किंमतीचे 360 साइड वॉल स्प्रिंकलर आणि 75 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असा एकूण 4 लाख 24 हजार 478 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .दिघी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपास करत आहेत.

अवैधरीत्या गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक
पिंपरी : अवैधरीत्या गांजा बाळगून त्याची विक्री करणाऱ्या नागरिकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई मंगळवार 18 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास आर एम डी इंटरनॅशनल स्कूल समोर वालेकरवाडी रोड येथे करण्यात आली.

गोविंद डोके पोलीस शिपाई यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय हरिभाऊ कांबळे (वय 58, रा .वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ- काळेपडळ, हडपसर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलासांनी दिलेल्या माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने कांबळे याची झडती घेतली असता त्याच्याकडे 18 हजार 300 रुपये किंमतीचा 346 ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल असा मुद्देमाल आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता हा गांजा त्याचा मुलगा शरण कांबळे यांनी विक्रीसाठी आणून दिल्याचे सांगितले. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घुंगरे, सहाय्यकपोलीस उपनिरीक्षक शेरखाने तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"