फक्त मुद्द्याचं!

23rd May 2026
गुन्हेगारी

ज्वेलर्सच्या दुकानातून 33 लाख 90 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी!

ज्वेलर्सच्या दुकानातून 33 लाख 90 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी!

पिंपरी : नेहरूनगर येथील शिवम ज्वेलर्स मध्ये एका व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने एकूण 39 नग सोन्याचे चैन वेगवेगळे आकाराचे, एकूण 225.800 ग्रॅम वजनाचे असे एकूण 33 लाख 90 हजार रुपयांचे सोन्याचे चैन चोरी केल्या. ही घटना शुक्रवार 22 मे रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संतोषी माता चौक, शिवम ज्वेलर्स नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी उमेश छगनलाल जैन (वय 53, रा. शंकेश्वरदर्शन बिल्डिंग, नेहरूनगर, पिंपरी )यांनी संततुकाराम नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बच्चू आशिष गांगोली (वय 36, रा. फ्लॅट नंबर आठ, भोसले आर्केड ,नेहरूनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने चोरीच्या उद्देशाने सोन्याचे 22 कॅरेटचे एकूण 39 नग सोन्याची चैन वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या वजनाचे असे एकूण 33 लाख 90 हजार रुपये किंमतीचे 225.800 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या चैनच चोरी केल्या आहे. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

कपाटात ठेवलेले 18 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने गेले चोरीला!
पिंपरी : राहत्या घराच्या उघड्या दारावाटे आत मध्ये येऊन अज्ञात चोरट्याने कपाटात ठेवलेले 18 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले. ही घटना 11 मे ते 20 मे 2026 या कालावधीत नवले पेट्रोल पंपा समोर, नवलेवस्ती, ताथवडे) येथे घडली.

याप्रकरणी सुखदेव दिनकर पवार (वय 54, रा. सर्वे नंबर 142/2 , नवले पेट्रोलपंपा समोर, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सचिन भगवान सहजराव (वय 40, पवार वस्ती, ताथवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दारावाटे आत मध्ये घुसून अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय कपाटात ठेवलेले 18 लाख रुपये किंमतीचे 22.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लबाडीच्या इराद्याने चोरून नेले. वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे तपास करत आहेत. उघड्या घरातून 18 लाख सोन्याचे दागिने चोरी

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"