कंपनीतील कामगाराने मालाचा अपहार व विक्री करून केली फसवणूक!

पिंपरी : कंपनीतील कामगाराने तयार झालेला नऊ लाख 45 हजार 249 रुपये किंमतीचा माल अपहार व विक्री करून फसवणूक केली.. ही घटना एक जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत इंडियन पॉलिमर्स, प्लॉट नंबर 305/ 2, सेक्टर नंबर 10, एमआयडीसी भोसरी येथे घडली.

या प्रकरणी अशोककुमार मिठालाल जैन (वय 53, रा. एन 3, फ्लॅट नंबर 501, एम्पायर इस्टेट चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .मिलिंद श्रीपाद कुलकर्णी (वय 58, रा. फ्लॅट नंबर सी/ एक, 102 ,खुशबू एक्झोटीका, पिंपळे गुरव), भगवान सुंदरराव लिंगायत (वय 40, विनायक नगर, बोऱ्हाडेवाडी ,मोशी)असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे कंपनीत काम करणारे कामगार यांनी संगणमत करून कंपनीतील तयार झालेला माल त्यांचा मित्र गुरुप्रसाद पाटील यांच्या मदतीने 945,249 किंमतीच्या मालाचा अपहर करून तो विक्री केला. त्यातून मिळालेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्याकरिता वापर करून आरोपींनी फिर्यादी यांची फसवणूक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तळेकर हे तपास करत आहेत.

