फक्त मुद्द्याचं!

23rd May 2026
गुन्हेगारी

व्यावसायिकाला शिवीगाळ करून लाकडी दांडुक्याने केली मारहाण; तिघांना अटक

व्यावसायिकाला शिवीगाळ करून लाकडी दांडुक्याने केली मारहाण; तिघांना अटक

पिंपरी : परिसरात राहणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीने एका व्यावसायिकाला शिवीगाळ करून लाकडी दांडुक्याने फिर्यादीस मारहाण करून जखमी केले. घटना गुरुवार 21 मे रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साई रेसिडेन्सी समोरील मैदानामध्ये ,गहुंजे ,ता.मावळ येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी प्रेमराज केशव सोळंकी (वय 28, फ्लॅट नंबर 306, साई रेसिडेन्सी, साईनगर गहुंजे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नागेश जंगले (वय 27), अभिषेक जंगले (वय 25), योगेश दडस (वय 25 ,रा. गल्ली नंबर 3, निसर्गदर्शन सोसायटी, साईनगर, ता.मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या ओळखीचे परिसरातील राहणारे आरोपी नागेश याने मैदानखाली करा असे म्हणून शिवीगाळ करू लागला. फिर्यादीने आरोपीला शिवीगाळ का करता असे विचारले असता आरोपीने त्यांना धक्काबुक्की केली .आरोपी याने मी साईनगरचा भाई आहे, इकडे राहायचे असेल तर इज्जतीत राहा, मी एकाला पण जीवंत सोडणार नाही असे बोलून हातातील लाकडी दांडुके हवेत फिरवून दहशत माजवली. आरोपी दोन व तीन यांनी फिर्यादीस दगड फेकून मारले. आरोपी क्रमांक एक याने फिर्यादीस लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या मानेवर, चेहऱ्यावर नखाने ओरबडले. फिर्यादीच्या आईला देखील आरोपींनी धक्काबुक्की केली. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गावडे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"