फक्त मुद्द्याचं!

24th May 2026
पिंपरी-चिंचवड

उद्यान विभागाची निविदा मिळवून देण्याचे आमिष; कर्मचारी निलंबित!

उद्यान विभागाची निविदा मिळवून देण्याचे आमिष; कर्मचारी निलंबित!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागा मध्ये निविदा मिळवून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उद्यान विभागातील मजूर अभिजीत संतोष गायकवाड याला अटक करण्यात आली होती. त्याचे सेवा निलंबन करून विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

viara vcc
viara vcc

उद्यान विभागातील मजूर अभिजीत गायकवाड यांनी भोसरी येथील एका व्यक्तीला उद्यान विभागात टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण केली. पैसे दिल्यानंतरही टेंडर न मिळाल्याने संबंधित व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गायकवाडला अटक केली. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. महापालिका कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने सामान्य प्रशासन विभागाने महापालिका अधिनियमांचा भंग केला असल्याचा ठपका गायकवाड याच्यावर ठेवून त्याचे सेवा निलंबन केले. याबाबत गायकवाड याची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"