Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

परदेशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून 83 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक!

परदेशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून 83 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक!

पिंपरी : परदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, आयपीओ यामध्ये गुंतवणूक केल्यास पाचशे टक्के नफा मिळणार असल्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 83 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 2 फेब्रुवारी ते सहा जून 2026 या कालावधीत पाश्र्वनाथ प्रतिष्ठा, फ्लॅट नंबर डी-20, चिखली येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी नावेद झुबेद चौधरी (वय 22, रा. पाश्र्वनाथ प्रतिष्ठा, फ्लॅट नंबर डी 20, शिवतेज नगर चिखली )यांनी सायबर शाखेकडे फिर्याद दिली आहे. आद्या सदाफळ, कुलदीप शर्मा आणि बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीस लिंक द्वारे गुंतवणुकी संदर्भात बनावट प्रमाणपत्र पाठवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून परदेशी शेअर मार्केट, स्टॉक मार्केट, आयपीओ यामध्ये गुंतवणूक केल्यास 500 टक्के नफा मिळणार असल्याचे आमिष दाखवले. फिर्यादीने गुंतवलेल्या 83 लाख 80 हजार रुपये रकमेवर वीस लाख रुपये यूएस डॉलर नफा दाखविण्यात आला. सदरचा नफा काढून घेण्यासाठी फिर्यादीस कन्व्हेन्शन फी, फायलिंग फी, कॅपिटल गेन टॅक्स, इन्शुरन्स, सेबी चार्जेस, लायसन फी, जीएसटी चार्जेस व ब्रोकरेज अशा प्रकारचे चार्जेस व फी साठी 83 लाख 80 हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यावर पाठवण्यास भाग पाडले. फिर्यादीने गुंतवलेली रक्कम व नफा असे एकूण 83 लाख 80 हजार रुपये काढण्यास गेले असता फिर्यादीस कोणत्याही प्रकारची रक्कम व नफा परत केला नाही. फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केली. सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"