Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

जमिनीच्या वादातून ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण!

जमिनीच्या वादातून ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण!

पिंपरी : जमिनीच्या ताब्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका जेष्ठ नागरिक महिलेला दांडक्याने मारहाण करून जखमी केले. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी भोसे, ता. खेड येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी सुलाबाई नामदेव बोराडे (वय 78, रा. वडगाव, मावळ) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सखाराम विठ्ठल लोणारी, नंदकुमार सखाराम लोणारी, चंद्रशेखर सखाराम लोणारी, शैला सखाराम लोणारी (सर्व रा. भांबोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी आणि नातू जमिनीला कंपाऊंड मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले आणि जमीन आमची आहे तुम्ही कसा ताबा घेता असे म्हणत त्यांनी वाद घातला. आरोपींनी तेथे पडलेल्या दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या खांद्यावर मारून त्यांना जखमी केले. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"