ज्यादा परतावा देण्याच्या आमिषाने पाच कोटी रुपयांची फसवणूक!

पिंपरी : कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून शेअर मार्केट आणि भिशीमध्ये नागरिकांची पाच कोटी तीन लाख 14 हजार 386 फसवणूक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून या आरोपींना जेरबंद करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश पुंजा आहेरकर, छाया रमेश आहेरकर, वेदांत रमेश आहेरकर, आणि आदित्य रमेश आहेरकर( रा. शुभारंभ रेसिडेन्सी, फ्लॅट नंबर 302, दत्त मंदिराजवळ माण, ता. मुळशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यांनी वेदांत फायनान्स सर्विसेस, त्रिवेणी पूजा भांडार व आदित्य इंटरप्राईजेस या फॉर्मच्या माध्यमातून फिर्यादी हनुमंत भागवत जाधव व इतर गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आश्वासन दिले. आरोपींनी शेअर मार्केट तसेच विविध गुंतवणूक योजनांमध्ये पैसे गुंतविण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करून मोठी रक्कम जमा केली. मात्र ठरलेला परतावा न देता आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासा दरम्यान वेदांत फायनान्शियनल सर्विसेस व आदित्य इंटरप्राईजेस या फॉर्मची व वैयक्तिक एकूण 11 बँक खाते डेबिट फ्रिज करण्यात आलेली आहेत.आरोपी यांनी हिंजवडी येथील आपले राहते घर बंद करून स्वतःचे अस्तित्व लपवून ते राहत होते.
आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनीता धुमाळ, पोलीस निरीक्षक सचिन शिर्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटके यांनी कारवाई केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथून या आरोपींना जेरबंद करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यादा नफ्याचे आमीष दाखवणाऱ्या योजनांमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी संबंधित संस्थेची चौकशी व पडताळणी करण्यात यावी. फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर लगेच तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे देखील आवाहन केले आहे.


