फक्त मुद्द्याचं!

22nd June 2026
गुन्हेगारी

विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगल्याने एकास अटक!

विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगल्याने एकास अटक!

पिंपरी : बेकायदेशीररित्या एक देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझिनसह एक जिवंत काडतूस असा 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जवळ बाळगल्याने एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवार 20 जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हिंजवडी, बोडकेवाडी येथे करण्यात आली.

याप्रकरणी दीपक भिमराव तांदळे पोलीस शिपाई, गुन्हे शाखा युनिट 1 यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रमेश नागेश भंडारी (वय 43, रा. मेझ्झा 9, हॉटेल रेस्टॉरंट हिंजवडी, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे अत्यावश्यक असल्याने कोणतेही घातक शस्त्र जवळ बाळगणे प्रतिबंधित आहे. आरोपी याने या आदेशाचे उल्लंघन करून एक देशी कट्टा पिस्टल व मॅक्झिनसह एक जिवंत काडतूस असा एकूण 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बिगर परवाना जवळ बाळगला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करीत आहेत. विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगल्याने एकास अटक

viara vcc
viara vcc

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. ही घटना निगडी येथे घडली आहे. याप्रकरणी रमेश सोपानराव फाळके यमुनानगर निगडी यांनी फिर्याद दिली आहे .

कनका शर्मा नावाची महिला व इतर अज्ञात बँक खातेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी व्हाट्सअॲप द्वारे संपर्क साधून गुंतवणुकी वर मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यानंतर विविध खात्यांमध्ये पैसे जमा करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"