फक्त मुद्द्याचं!

22nd June 2026
पिंपरी-चिंचवड

“निरोगी आरोग्य व वृद्धत्वासाठी योग”; संकल्पनेवर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग दिन साजरा !

“निरोगी आरोग्य व वृद्धत्वासाठी योग”; संकल्पनेवर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये योग दिन साजरा !

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या यंदाच्या संकल्पनेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या ११० प्राथमिक व २४ माध्यमिक अशा एकूण १३४ शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक योगाभ्यास करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.

viara vcc
viara vcc

विशेष बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय योग दिन यंदा रविवारी आला असतानाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शाळांमध्ये उपस्थिती दर्शविली. सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांनी स्वखुशीने सहभाग नोंदवत योगाबद्दलची जागरूकता आणि उत्साह दाखवून दिला.

योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य वारसा असून शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त आहे. यंदाच्या “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच योगाची सवय निर्माण होऊन आयुष्यभर निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला.

महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सकाळी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सूर्यनमस्कार, विविध योगासने, प्राणायाम तसेच ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यासाचे महत्त्व समजावून सांगत योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, मानसिक ताण कमी होतो, एकाग्रता सुधारते आणि निरोगी जीवन जगण्यास मदत होते, अशी माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध योगासनांचे सादरीकरण केले. अनेक शाळांमध्ये योगविषयक मार्गदर्शन, प्रबोधनपर उपक्रम आणि आरोग्यविषयक चर्चांचे आयोजनही करण्यात आले.

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाने नियमित योगाभ्यासाचा संकल्प करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी रविवारीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्याबाबतची जागरूकता दाखविली आहे. विद्यार्थ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीची सवय रुजविण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात. -रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"