फक्त मुद्द्याचं!

21st June 2026
पुणे

रेल्वे फाटकमुक्तीच्या दिशेने ‘पीएमआरडीए’ आणि ‘महारेल’मध्ये सामंजस्य करार!

रेल्वे फाटकमुक्तीच्या दिशेने ‘पीएमआरडीए’ आणि ‘महारेल’मध्ये सामंजस्य करार!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या आणि रस्ते रेल्वेफाटकमुक्त करण्याच्या दृष्टीने आज (शुक्रवार) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. ‘पीएमआरडीए’ हद्दीतील रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) आणि रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्ग (आरयूबी) यांच्या जलद व दर्जेदार बांधकामासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.’ (महारेल) या कंपनीसोबत अधिकृत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे पुणे महानगर प्रदेशातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतुकीच्या प्रश्नांच्या निराकरणास मोठी मदत होणार आहे.

viara vcc
viara vcc

यासंदर्भात पूर्वी झालेल्या बैठकींमध्ये रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, पादचारी पूल (एफओबी) आणि भुयारी मार्ग यांची कामे वेगवेगळ्या यंत्रणांमार्फत करण्याऐवजी, या कामांमध्ये तांत्रिक अनुभव असलेल्या ‘महारेल’मार्फतच करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या प्रक्रियेला गती मिळाली.

या निर्देशांनंतर ‘पीएमआरडीए’अंतर्गत हे प्रकल्प ‘महारेल’कडे सोपविण्याच्या दृष्टीने दोन्ही संस्थांमध्ये बैठकांचे सत्र पार पडले. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सामंजस्य कराराचा मसुदा तातडीने अंतिम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज या मसुद्यावर दोन्ही बाजूंकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल आणि ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. यावेळी ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता (प्रभारी) शिवप्रसाद बागडी यांच्यासह दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"