अंमली पदार्थ गांजा विक्री ; एकास अटक!

पिंपरी : बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवार 18 मे रोजी रात्री साडेसातच्या सुमारास तळेगाव एमआयडीसी रोड जवळ, कैलास किसन पडवळ यांचे घरासमोर, मोकळ्या जागेत, नवलाख उंबरे येथे करण्यात आली.

याप्रकरणी सदानंद विजय रुद्राक्ष पोलीस शिपाई, अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तेजस कैलास पडवळ (वय 25, रा. गट नंबर 498, एमआयडीसी रोड, दत्त मंदिर जवळ नवलाख उंबरे, ता. मावळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याशिवाय राहुल मचाले (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास किसन पडवळ यांच्या घरासमोर मोकळ्या जागेत ता. मावळ येथे आरोपीने 27 हजार 900 रुपये किमतीचा 358 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने त्याला अटक करण्यात आली. अंमली पदार्थ गांजा पोलिसांनी जप्त केला. तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस फौजदार चौधरी हे तपास करत आहेत.

