एक लाख रुपयांची खंडणीची मागणी; चौघांना अटक!

पिंपरी : बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम मला का दिले नाही? तुमच्यामुळे माझा लॉस झाला. मला आत्ताच्या आत्ता एक लाख रुपये द्या, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन एका व्यक्तीकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना सोमवार 18 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रासझिंग स्पेसेस कंपनी हिंजवडी, ता. मुळशी येथे घडली.

या प्रकरणी अनिल शिवाजीराव अंभुरे (वय 30, फ्लॅट नंबर 101, विद्या व्हॅली स्कूल, महादेव नगर, सुस) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दत्तात्रय अर्जुन ठाकर, चेतन ओव्हाळ, सुशांत भालेकर, संदीप देशभ्रतार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ब्रोझा कार नंबर (एम एच 14, एचडी 0330) कार मधून येऊन अनाधिकाराने फिर्यादी यांचे ऑफिस केबिन मध्ये येऊन शिवीगाळ केली. माण येथील साइटवर लागणारे बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम मला का दिले नाही? माझे कडून साहित्य खरेदी का केले नाही? तुमच्यामुळे माझा खूप लॉस झाला आहे. मला आत्ताच्या आत्ता एक लाख रुपये द्या, नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही. गाडीत हत्यार ठेवले आहेत अशी आरोपींनी धमकी देऊन फिर्यादीकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करत आहेत.

