25 हजार रुपयांच्या कमिशनवर सायबर फसवणुकीसाठी बँक खाते दिले वापरण्यास!

पिंपरी : सायबर फ्रॉड करण्यासाठी 25 हजार रुपये कमिशन घेऊन आपले बँक खाते सायबर फसवणुकीसाठी वापरण्यास दिल्याने दोघाजणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीत लक्ष्मी निवास मारुती मंदिरा जवळ, बोपखेल येथे घडली.

या प्रकरणी वैभव गोरख काकडे पोलीस शिपाई दिघी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दाखल केली आहे. प्रतीक मोहन घुले (वय 22, रा लक्ष्मी निवास मारुती मंदिराजवळ, बोपखेल) श्रीतेज नाना बुलाखे (वय 21, रा. गायकवाड नगर, दिघी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने त्याचा मित्र क्रमांक दोन या साथीदाराशी संगणमत करून ग्रुपचा एक सभासद म्हणून स्वतःचे नावे असलेले एस बँक अकाउंट खाते सायबर फ्रॉड साठी वापरण्यास दिले. या खात्यावर 22 लाख 74 हजार 640 रुपये स्वतःच्या बँक खातेवर स्वीकारल्याचे दिसून आले आहे. आरोपी क्रमांक दोन याने प्रतीक घुले याच्याशी संपर्क करून त्याचे बँक खाते पंचवीस हजार रुपये कमिशन देऊन सायबर फ्रॉड साठी उपलब्ध करून दिले. आरोपी क्रमांक एक व दोन विविध लोकांशी संपर्क करून असे सायबर फ्रॉड साठी बँक खाते उपलब्ध करून देतात असे त्यांचे मोबाईलची पाहणी केली असता दिसून आले आहे. सायबर फसवणुकीसाठी 25 हजार रुपयांच्या कमिशनवर बँक खाते दिले वापरण्यास

