Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

13th September 2026
गुन्हेगारी

अवैध दारू विक्री करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध!

अवैध दारू विक्री करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगार ‘एमपीडीए’ कायद्यान्वये स्थानबद्ध!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सांगवी ,उत्तर महाळुंगे एमआयडीसी व हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन सराईत गुन्हेगारांवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी ‘एमपीडीए’ कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैध दारू व्यवसायाला शून्य सहनशीलता असून समाजाच्या जीवाशी खेळणाऱ्या अवैध दारू माफियांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही. यासाठी पोलीस आयुक्तांनी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार यांनी दिली आहे. त्यानुसार कोंडीबा आडेप्पा कांबळे (वय 37, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव), जीवन मारुती रजपूत (वय 48, रा. गोनवडी, ता. खेड), धनराज सोमाजी नट (वय 35, रा. माण रोड, हिंजवडी) या सराईत गुन्हेगारांवर बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करणारे गुन्हे दाखल आहेत. या याप्रकरणी अनुक्रमे सांगवी पोलीस स्टेशन, उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन व हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्य करणाऱ्या या गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ ‘अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.

जानेवारी ते जुलै 2026 अखेर एकूण 11 गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे असे पोलीस उपायुक्त यांनी सांगितले. आयुक्तांनी केलेल्या कारवाईनुसार ‘एमपीडीए’ ‘कायद्यान्वये एक वर्ष कालावधीसाठी स्थानबद्धतेचे आदेश दिले आहेत. कोंडीबा आडेप्पा कांबळे यास (हर्सूल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर), जीवन मारुती रजपूत (हरसुल मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर), धनराज सोमाजी नट (येरवडा मध्यवर्ती कारागृह,पुणे) येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, बालाजी पांढरे, दिगंबर सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"