फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
विधानसभा २०२४

धावपटू,सायकलपटूंची मतदान करण्याची शपथ

धावपटू,सायकलपटूंची मतदान करण्याची शपथ

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, या‌द्वारे प्रतिज्ञा करतो की, आम्ही धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू.” अशी शपथ धावपटू, सायकलपटूंनी रविवारी घेतली. महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी रनथॅान उपक्रम राबविला.

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमात निवडणूकीत मतदान करण्याची शपथ घेतली. आज पहाटे ६ वाजता निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमास मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, प्रांतपाल नितीन ढामले, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुहास ढमाले,रनथाॅनचे संचालक केशव मानगे, उप आयुक्त अण्णा बोदडे, रोटरी क्लबचे सचिव डाॅ.रविंद्र कदम, शशांक फडके उपस्थित होते. रनथॅान कार्यक्रमात सहभागी झालेल्या धावपटू, सायकलपटूंनी स्वयंस्फूर्तीने मतदान जनजागृतीचे फलक धरले. त्यांनी सेल्फीही काढले आणि येणा-या निवडणूकीत केवळ मतदानच नव्हे तर मतदान जनजागृतीचा प्रसार व प्रचार करण्याची तयारी दर्शविली.

मतदार नाव नोंदणीचाही केला प्रचार
एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी आजच्या कार्यक्रमात मतदार यादी नाव नोंदणी करणे,नांव तपासणे,नांव दुरूस्ती करणे यासाठी फ्लेक्सद्वारे प्रसिद्ध प्रचार करण्यात आला. ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो.’, ‘जना-मनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे.’, ‘आपले अमूल्य मत,करेल लोकशाही मजबूत’, अशा आशयाचे मतदान जनजागृतीचे फलक अधिकारी, खेळाडू आणि उपस्थित नागरिकांच्या हातात दिसून आले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"