फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

सीताराम बहुरे उपआयुक्त पदावर

सीताराम बहुरे उपआयुक्त पदावर

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रिक्त असलेल्या पदावर उपआयुक्त पदी सीताराम बहुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणक अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सर्व सेवाविषयक तपशील पडताळून सीताराम बहुरे यांना शासन मान्यतेच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्याच्या निर्णयास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असणारे सीताराम बहुरे यांची उपआयुक्त पदी पदोन्नती झाली असून ते सध्या फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"