फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान महान

राष्ट्र उभारणीत शिक्षकांचे योगदान महान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे मोलाचे कार्य करत असतात. शिक्षक हा व्यक्तीच्या विकासातील सर्व टप्यांवर महत्वाचा घटक मानला जातो. म्हणूनच जग कितीही बदलले, तरी खऱ्या शिक्षकांचे स्थान, प्रतिमा आणि महत्व हे इतर क्षेत्रातील व्यक्तींपेक्षा उच्च स्थानी असतं. असे मत प्रेरणा शिक्षण संस्थेचे मानद सचिव कांतीलाल गुजर यांनी व्यक्त केले.

थेरगाव येथील प्रेरणा शिक्षण संस्थेच्या शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. प्रेरणा शिक्षण संस्थेच्या थेरगाव, वाल्हेकरवाडी, नेरे येथील बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील ८० गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गुजर, मानद सचिव कांतीलाल गुजर, संचालक नंदकिशोर तोष्णीवाल, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, मुख्याध्यापक महेंद्र पवार, अर्जुन शेटे, उमेश आगम, अशोक खताळ, कृष्णराव नाईकरे, प्रेरणा बँकेचे संचालक राजेंद्र शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संचालक नंदकिशोर तोष्णीवाल म्हणाले, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अतूट असते. प्रेरणा शिक्षण संस्था ही आदर्श संस्था असून येथील प्रत्येक शिक्षक उपक्रमशील आहेत. याप्रसंगी शिक्षकांमधून उमेश आगम, ज्ञानेश्वर बोरसे, विजय जाधव, दादा शेजाळ यांनी मनोगते व्यक्त केली. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले. ज्योती धुरपते यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र पवार यांनी आभार मानले.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"