Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

8th July 2026
पिंपरी-चिंचवड

नाल्यांचा नैसार्गिग प्रवाह रोखणाऱ्यांवर करणार कारवाई : आयुक्त डॉ.सूर्यवंशी

नाल्यांचा नैसार्गिग प्रवाह रोखणाऱ्यांवर करणार कारवाई : आयुक्त डॉ.सूर्यवंशी

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शहराचा विभागनिहाय आराखडा तयार करणार
पिंपरी, दि. ८ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी शहराच्या भौगोलिक रचनेचा, नैसर्गिक नाल्यांचा, पर्जन्यमानाचा तसेच वातावरणीय बदलांचा सखोल अभ्यास करून विभागनिहाय सर्वंकष आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. तसेच नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडविणारे अतिक्रमण अथवा अडथळे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

viara vcc
viara vcc

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या पूर व पाणी साचण्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस आमदार शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रम बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंते मनोज सेठिया, अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकत्याच उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, अशा प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीतून प्रशासनाला महत्त्वाचे धडे मिळतात. त्या अनुभवांच्या आधारे भविष्यातील नियोजन अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या कार्यपद्धतीतील उणिवा दूर करून समन्वयाने कार्य करावे.

बैठकीत साधनसामग्रीची उपलब्धता, मनुष्यबळाचा समन्वय, क्षेत्रनिहाय प्रतिसाद व्यवस्था आणि पूरनियंत्रण उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील काही भागांमध्ये नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अडथळ्यांमुळे बाधित झाल्याने पाणी साचल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत सर्व नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या तसेच एमआयडीसी परिसरातील नाल्यांचा प्रवाह सुरळीत करण्याच्या सूचना

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"