Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

8th July 2026
पिंपरी-चिंचवड

मोशी कचरा डेपो मध्ये ईमारत ढासळली; ढिगाऱ्याखाली कर्मचारी अडकले!

मोशी कचरा डेपो मध्ये ईमारत ढासळली; ढिगाऱ्याखाली कर्मचारी अडकले!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मॉडेलवर विकसित केलेल्या वेस्ट एनर्जी प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्याचा ढीग प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने इमारतीच्या ढिगार्‍याखाली 15 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे .

viara vcc
ra vcc

मोशी कचरा डेपो येथे दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा ढीग तीन मजली इमारतीवर कोसळला आहे. या इमारतीखाली अंदाजे १९ व्यक्ती अडकल्या होत्या. त्यातील ४ व्यक्तींना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्य करण्यासाठी भारतीय सेनेचे देहूरोड येथील दल आले असून यामध्ये 4 अधिकारी आणि 25 जवान आहेत. एनडीआरएफ घटनास्थळी दाखल झाले असून महापालिकेचा अग्निशमन दल, पोलीस या बचाव कार्यात सहभागी आहे. महापौर रवि लांडगे, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे घटनास्थळी असून बचावकार्य सुरू आहे.

दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक अग्निशामक दल ,पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पदके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून ढिगारा उपसण्याचे काम सातत्याने केले जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील कचरा मोशी येथील कचरा डेपो मध्ये टाकण्यात येतो. या कचऱ्याचे ढीग टेकड्यां एवढे उंच झालेले असून गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढिगारा या इमारती वर कोसळल्याने इमारत कोसळली आहे. इमारतीच्या ढिगार्‍यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठीची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. कचऱ्यापासून पीपीपी तत्त्वावर वीज निर्मिती येथून केली जाते.

पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण कचरा या ठिकाणी टाकला जातो. शहराची लोकसंख्या 30 लाखांपेक्षा जास्त झाली असून सध्या 1579 टन प्रतिदिन कचरा या ठिकाणी ढब केला जातो. डेपोची क्षमता संपुष्टात आली आहे. पुनावळे या ठिकाणी कचरा डेपोसाठी आरक्षित असलेली जागा अन्य संस्थांना भाडेतत्त्वावर महापालिकेने दिल्याने भविष्यात कचरा संकलनाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"