फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
पिंपरी-चिंचवड

गणेश मूर्ती बनवा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेश मूर्ती बनवा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : चिंचवड येथील एआयसीटी डिझाइन अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एआयसीटी डिझाइन अकॅडमीने ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने कार्यशाळेत भाग घेतला. विशेषत: पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या तंत्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध पार्श्वभूमीतील सहभागी झालेल्यानी स्पर्धकांनी मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. गणेशोत्सवासाठी सुंदर आणि टिकाऊ मूर्ती तयार करण्याची मिळालेल्या संधीचे सोने केले.

कार्यशाळेत एआयसीटीच्या संचालिका लीना सप्रा उपस्थित होत्या. वास्तुविशरद अपर्णा शिंदे यांनी सहभागींना मूर्ती बनवण्याच्या सखोल प्रक्रियेचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाने सांस्कृतिक अध्यात्मिक प्रथांमध्ये पर्यावरण-जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थित सर्वांनी याचे कौतुक केले. दिवसेंदिवस वाढत चालेले प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. पाण्यात सहज विरघळेल अशा मूर्ती बनवण्यासाठी एआयसीटी डिझाइन अकॅडमीने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून पारंपारिक कलेला आधुनिकतेची जोड देवून टिकाऊ पद्धतींच्या संमिश्रणाने सर्जनशील प्रतिभेचे दर्शन घडवले. आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती सौ. सप्रा यांनी दिली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"