फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
क्रीडा

नको भीती उष्माघाताची.. काळजी घ्या आरोग्याची..

नको भीती उष्माघाताची.. काळजी घ्या आरोग्याची..
प्रतिनिधी, पिंपरी - एप्रिल महिना संपून आता मे महिना सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यभरात सगळ्याच शहरांमध्ये तापमान वाढलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. या काळात उष्माघाताची भीती असते. त्यामुळे शहरातल्या नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

उष्माघाताची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत वैद्यकीय विभागाने नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.गर्भवती महिला, बालके, लहान मुले, खेळाडू, सतत उन्हात काम करणारी व्यक्ती, वयस्कर, वृद्ध, ज्या व्यक्तींना बीपी व शुगरचे आजार, हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार, मूत्रपिंडाचे विकार, यकृताची आजार आणि आजारी असणाऱ्या व्यक्तींनी अर्थात अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी विशेष काळजीचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

कोणाला आहे उष्माघाताचा धोका?

  • उन्हाळ्यात शारिरीक श्रम करणारे
  • मेहनतीचे व मजुरीची कामे फार वेळ करणे
  • कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे
  • काच कारखान्यात काम करणारे मजूर
  • जास्त तापमानाच्या खोलीत काम करणारे कामगार
  • घट्ट कपड्यांचा वापर केल्यास

तातडीचे उपचार काय कराल?

  • रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा
  • हातापायाला गोळे आल्यास तेथील स्नायूला हलका मसाज द्या
  • थोडे-थोडे पाणी प्यायला द्या
  • उलटी झाली तर पाणी देऊ नका
  • रुग्णाला थंडजागी शक्यतो एसीमध्ये झोपवा.
  • अंगावरील कपडे सैल करा.
  • ओल्या व थंड फडक्याने अंग पुसत रहावे.
  • रुग्णाला त्वरित उपचारासाठी नजिकच्या दवाखान्यात हलवावे

काय असतात उष्माघाताची लक्षणे?

  • ताप येणे, त्वचा गरम व कोरडी
  • त्वचा लाल होणे व घाम न येणे
  • मळमळ तसेच उलटी होणे
  • हातापायात गोळे येणे, थकवा
  • रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता
  • डिहायड्रेशन, चक्कर येणे
  • डोके दुखणे, छातीत धडधड
Juicing for Health: Is Fresh Juice Good for You?

प्रतिबंधात्मक उपाय काय करता येतील?

  • उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, टोपीचा वापर
  • धुम्रपान, मद्यपान, चहा, कॉफी टाळावी
  • लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी प्यावे
  • फिकट रंगाचे सुती कपडे वापरावेत
  • पिण्याचे पाणी सोबत ठेवावे
  • कष्टाची कामे टाळावीत
  • लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला
Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"