फक्त मुद्द्याचं!

20th May 2024
क्रीडा विषयक न्यूज
क्रीडा सहकार

क्रीडा विषयक न्यूज

संजना होरोचे ५गोल; तेलंगणा हॉकीच ११-१ असा धुव्वा उडवत हॉकी बंगाल उपांत्यपूर्व फेरीत हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा; हॉकी झारखंडही अंतिम ८ संघांमध्ये फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्कपुणे : संजना

  • PublishedMarch 23, 2024

संजना होरोचे ५गोल; तेलंगणा हॉकीच ११-१ असा धुव्वा उडवत हॉकी बंगाल उपांत्यपूर्व फेरीत

हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा; हॉकी झारखंडही अंतिम ८ संघांमध्ये

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे : संजना होरोने तिचा सर्वोत्तम फॉर्म कायम ठेवत आणखी एका हॅटट्रिकसह ५ गोल केल्याने हॉकी बंगालने तेलंगणा हॉकीचा ११-१ असा धुव्वा उडवत पूल एचमध्ये अपराजित राहताना १४व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरूनगर, पिंपरी येथे झालेल्या सामन्यांत एकतर्फी लढतीत, संजनाने चौथ्या, २०व्या, २१व्या, ३८व्या आणि ४४व्या मिनिटाला असे पाच गोल करताना सुस्मिता पन्नाने (सहाव्या, १०व्या, ४२व्या मिनिटाला) तीन, मोनिका नागने (सातव्या, ४०व्या मिनिटाला) आणि कर्णधार अंजना डुंगडुंग (पाचव्या मिनिटाला) एकगोल करताना सांघिक खेळ उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली.

संजनाने यापूर्वी हॉकी गुजरातविरुद्ध तब्बल आठ गोल केले होते.

हॉकी बंगालने सर्व सामने जिंकण्याची करामत साधताना पूल एचमध्ये नऊ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तसेच पुढील फेरीत दिमाखात स्थान मिळवले. या पुलमध्ये तमिळनाडू आणि हॉकी गुजरातच्या हॉकी युनिट संघांचाही समावेश आहे.

तथापि, पूल सी गटात हॉकी आंध्र प्रदेशवर ११-२ अशी मोठ्या फरकाने मात करूनही उत्तर प्रदेश हॉकीचे आव्हान गटवार साखळीतच संपुष्टात आले.

अनुभवी वंदनिया कटारियाची (४३, ५०, ५५व्या मिनिटाला) गोल हॅट्ट्रिक, मुमताज खान (२७ आणि ४७व्या मिनिटाला) आणि उपासना सिंगच्या (३५आणि ४६व्या मिनिटाला) प्रत्येकी दोन गोल आणि शशिकला (१४ व्या मिनिटाला), रीतू सिंग (२७व्या मिनिटाला), स्वर्णिका रावत (३८व्या मिनिटाला) आणि सिमरन सिंगच्या (५७व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोलच्या जोरावर उत्तर प्रदेश हॉकीने दोन आकडी गोल केले.

Written By
Admin@BLOG

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"