तीन पत्ती जुगारावर पोलीसांचा छापा;चौघे ताब्यात!

पिंपरी : बेकायदेशीररित्या तीन पत्ती पान नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून चौघा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 26,604 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई शुक्रवार 19 जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एस आर एस स्कीम मधील, नवीन बांधकामाच्या इमारती समोरील मोकळ्या जागेत जय भीमनगर, दापोडी येथे करण्यात आली.

याप्रकरणी आकाश श्रावण सोनवणे (वय 35) पोलीस शिपाई, दापोडी पोलीस स्टेशन यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कृष्णा रामदुलार यादव (वय 30, रा. 187 एसटी रोड, दापोडी), राकेश विजय जाधव (वय 33, जयभीम नगर, दापोडी), दीपक लक्ष्मण साळुंखे (वय 31, रा. सीएमई गेट समोर, दापोडी), विशाल दिलीप ओव्हाळ (वय 27, रा. बापू काटे चाळ, वार्ड नंबर तीन, जय भीम नगर, दापोडी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकला. आरोपीकडे 26 हजार 740 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलीसांनी जप्त केला. दापोडी पोलीस ठाण्याचे रोकडे हे तपास करत आहेत.

