फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
पिंपरी-चिंचवड

महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी सुरक्षित ठेवावी; यशवंतभाऊ भोसले

महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी सुरक्षित ठेवावी; यशवंतभाऊ भोसले

महापौर व स्थायी समितीचे सभापती यांच्याकडे मागणी
पिंपरी : विविध विभागांत कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या साडेचार ते पाच हजार कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी (निवृत्ती वेतन लाभ) आणि बोनसचा गंभीर प्रश्नही प्रशासनासमोर मांडला असून कंत्राटी कर्मचाऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महापालिकेने थेट ‘प्रिन्सिपल एम्प्लॉयर’ (मुख्य नियोक्ता) म्हणून जबाबदारी घ्यावी या संदर्भात महापौर रवी लांडगे आणि स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी होकार दर्शवल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी पिंपरी पत्रकार परिषदेत दिली.

viara vcc
viara vcc

भोसले यांनी पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले की,सध्याच्या प्रथेनुसार महापालिकेचे टेंडर (कंत्राट) बदलले की जुना कंत्राटदार निघून जातो. अनेक वर्षे काम करूनही कर्मचारी निवृत्त झाल्यावर किंवा त्याला कामावरून काढल्यावर त्याला ग्रॅच्युइटी मिळत नाही. नवीन कंत्राटदार ‘माझा जुन्या ग्रॅच्युइटीशी काय संबंध?’ म्हणून हात झटकून मोकळा होतो, कारण टेंडरच्या अटींमध्ये ग्रॅच्युइटीचा उल्लेखच नसतो.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांना एक महत्त्वपूर्ण आणि व्यावहारिक पर्याय सुचवला आहे.यामध्ये कामगाराचे महापालिकेने ‘प्रिन्सिपल एम्प्लॉयर’ म्हणून एक स्वतंत्र बँक खाते उघडावे.

आगामी सर्व टेंडर्समध्ये कंत्राटदारांना कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी, दिवाळी बोनस आणि इतर कायदेशीर भत्त्यांची रक्कम अनिवार्यपणे या खात्यात जमा करण्याची अट घालावी. तसेच यामुळे कंत्राटदार बदलला तरी कर्मचाऱ्यांची वर्षानुवर्षांची ग्रॅच्युइटी पालिकेच्या खात्यात सुरक्षित राहील आणि निवृत्तीच्या वेळी त्यांना त्यांचा हक्क विनाविलंब मिळेल.कामगारांच्या हिताच्या या महत्त्वपूर्ण सूत्राला महापौर आणि स्थायी समिती चेअरमन यांनी पूर्ण पाठिंबा दिला असून, “कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक आहे आणि आम्ही लवकरच यावर शिक्कामोर्तब करू,” असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्याचे यशवंतभाऊ भोसले यांनी सांगितले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"