फक्त मुद्द्याचं!

19th June 2026
गुन्हेगारी

दुकानासमोर चायनीज गाडी लावल्याने लाकडी दांडूके आणि बियरच्या बाटलीने मारहाण!

दुकानासमोर चायनीज गाडी लावल्याने लाकडी दांडूके आणि बियरच्या बाटलीने मारहाण!

तिघांना अटक
पिंपरी : दुकानासमोर चायनीज गाडी लावलेच्या रागातून चायनीज गाडी मालक त्याचा भाऊ आणि मित्र यांना लाकडी दंडुके आणि बियरच्या बाटलीने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवार 17 जून रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास विकी वाईन समोर, शिवाजी चौक, चिंचवड स्टेशन येथे घडली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी लक्ष्मण केशवलाल बुडा (वय 19, रा. मॅजेस्टिक हॉटेल शेजारी, गंगानगर आकुर्डी, मूळ गाव- कैलाली सुदूर पश्चिम, पोस्ट ओडा, नंबर नऊ, नेपाळ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुरुषोत्तम दासानी, राहुल खेमचंद दासानी (वय 28, रा.भेळ चौक, निगडी प्राधिकरण), सौरव संतोष सिंग (वय 28, रा.जागृती निवास, पिंपरी कॉलनी, पिंपरी), सुमित रमेश थोरात (वय 23, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे)अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी क्रमांक दोन ते चार यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे चायनीज गाडी बंद करीत असताना विकी वाईनचे मालक पुरुषोत्तम दासांनी त्यांच्या भावाचा मुलगा राहुल दासांनी त्यांच्या हातात लाकडी दांडके, दुकानातील कामगार सौरव सिंग व सुमित थोरात यांच्या हातात बियरची बाटली असे घेऊन फिर्यादीच्या जवळ जाऊन पुरुषोत्तम दासांनी यांनी चायनीज गाडा हा दुकानासमोर लावू नका असे फिर्यादीस म्हणून फिर्यादीस अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली.

आरोपीचे कामगार सौरभ सिंग व सुमित थोरात यांनी त्यांचे हातातील बियरची बाटली फिर्यादीचे डोक्यात फोडून फुटलेल्या बाटलीने डोक्यात वार केले. तसेच राहुल दासांनी यांनी लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीवर व डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादीचा भाऊ दीपक बुडा यास राहुल दासांनी याने तेथे पडलेली बियरची बाटली फोडून कपाळावर मारून जखमी केले. कामगार सौरभ सिंग व सुमित थोरात यांनी फिर्यादीच्या भावाच्या डोक्यात तेथे पडलेल्या दगडी मारून जखमी केले. त्यानंतर पुन्हा चौघांनी फिर्यादीचा भाऊ दीपक बुडा यास लाकडी दांडक्याने दगडाने मारून दुखापत केली. पिंपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"