फक्त मुद्द्याचं!

20th June 2026
गुन्हेगारी

1 लाख 71 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक!

1 लाख 71 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक!

चाकण : बेकायदेशीररित्या एक लाख 71 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार 18 जून रोजी दीड वाजण्याच्या सुमारास खराबवाडी गावचे हद्दी जगदंब हॉटेल जवळ, ता. खेड येथे करण्यात आली.

याप्रकरणी राजेश वसंत गिरी पोलीस शिपाई, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनोज जगदीश पाचंगे (वय 21, खराबवाडी, ता. खेड, मुळगाव- वाघोडा वैदस, वडगाव मंठा, जि. जालना), रईस सरवर तडवी (वय 25, रा. खराबवाडी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक याने त्याच्या ताब्यात एकूण 1 लाख 71 हजार रुपये किंमतीचा 3 किलो 420 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ गांजा बेकायदेशीररित्या नागरिकांना विक्री करिता जवळ बाळगला. आरोपी क्रमांक एक याने हा अंमली पदार्थ गांजा आरोपी क्रमांक दोन याचे कडून घेतला असल्याचे सांगितले. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पिंजारी हे तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

वाहन चालकांवर कारवाई 1 कोटी 85 लाख 13 हजार रुपये दंड वसूल!
पिंपरी : वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर प्रतिबंध करण्यासाठी एक जून ते 15 जून 2026 या कालावधीत वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई करण्यात आली. या कारवाईत 19 हजार 35 वाहन चालकांकडून 1 कोटी 85 लाख 13 हजार 300 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त वाहतूक विक्रांत देशमुख यांनी दिली.

कारवाई करण्यात आलेल्या वाहनांमध्ये काळी काच 2562, मॉडीफाईड सायलेन्सर 1018 , जड अवजड वाहनांवर कारवाई 4444, वाहतुकीस अडथळा नो पार्किंग 10607, ड्रंक अँड ड्राईव्ह 404, याप्रमाणे 19 हजार 35 चालकां कडून 1 कोटी 85 लाख 13 हजार 300 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई चाकण, भोसरी, तळेगाव, हिंजवडी, तळवडे, चिखली, आयटी पार्क क्षेत्र, देहू- आळंदी, पिंपरी बाजारपेठ आणि महामार्गावर करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"