फक्त मुद्द्याचं!

16th June 2026
पिंपरी-चिंचवड

पुनावळे यथील खाजगी शिक्षण संस्थेत स्थानिकांसाठी प्रवेशात आरक्षण द्यावे : राहुल कलाटे

पुनावळे यथील खाजगी शिक्षण संस्थेत स्थानिकांसाठी प्रवेशात आरक्षण द्यावे : राहुल कलाटे


सर्वसाधारण सभेत नगरसेवक राहुल कलाटे यांनी मांडली उपसूचना
पिंपरी : पिंपरी पुनावळे येथील 91 गुंठे जागा खासगी संस्थेला तब्बल तीस वर्षासाठी नाममात्र भाडेतत्त्वावर घेण्यास सत्ताधार्यांसह विरोधकांनी कडाडून विरोध केला असताना देखील हा विरोध डावलून तो विषय उपसूचनेसह मंजूर करण्यात आला .पुनावळे येथील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित जागा मुंबई येथील ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनला सात कोटी रुपये भाडे दराने तीस वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा विषय सर्वसाधारण सभेसमोर आला होता. त्यावेळी शिक्षणाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली.

viara vcc
viara vcc

या विषयावर वाकड, ताथवडे ,पुनवळे वार्डाचे स्थानिक नगरसेवक कुणाल वाव्हळकर, रेश्मा भुजबळ ,श्रुती वाकडकर ,आणि राहुल कलाटे यांनी हा विषय दप्तरी दाखल करण्याची जोरदार मागणी केली. स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्याच्या पाठीमागे कोण आहे याची माहिती कोणालाच नाही. या संस्थेला केवळ एक वर्षाचा अनुभव असताना देखील तीस वर्षासाठी 91 गुंठे जागा नाममात्र भाड्याने देऊन पालिकेने येथील स्थानिक गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे .ही संस्था आता व्यवसाय करून श्रीमंतांनाच मोठ्या अनुदानाद्वारे येथे शिक्षण देईल असा आरोप करण्यात येत आहे .निलेश बारणे. माया बारणे. प्रमोद कुटे, यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी मात्र या विषयाचे समर्थन केले आहे. चांगल्या शैक्षणिक संस्था आपल्या परिसरात याव्यात, शैक्षणिक गुणवत्तेचा देखील विचार करावा असे शितोळे म्हणाले यानंतर महापौरांनी हा विषय उपसूचनेसह मंजूर केला

पुनावळे परिसरातील माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली जागा खाजगी शिक्षण संस्थेला भाड्याने देण्याच्या प्रस्तावाबाबत नगरसेवक राहुल कलाटे यांनी महासभेत उपसूचना मांडत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या विषयाची सखोल चौकशी करण्याची तसेच महापालिकेने स्वतः अत्याधुनिक शाळा विकसित करण्याची मागणी केली आहे.

महापालिकेची पुनावळे येथे ९१ गुंठे जागा आहे. ताब्यात असलेल्या या जागेवर विकास आराखड्यात माध्यमिक शाळेचे आरक्षण आहे. ही जागा खासगी संस्थेला भाडे तत्त्वावर देण्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर हा विषय मनपाच्या सर्वसाधारण सभेत चर्चेत आला. त्यावेळी स्थानिक भाजप नगरसेवकांनी या प्रस्तावाला विरोध असल्याचे नोंदवले. त्यांच्यावतीने राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत उपसूचना मांडली.

राहुल कलाटे यांनी सांगितले की, एवढा मोठा निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांना विश्वासात घेतल्याचे दिसून येत नाही. संबंधित जागा सुमारे १८० गुंठे असून, त्यापैकी केवळ ९१ गुंठे जागाच ताब्यात आलेली आहे आणि तीही समप्रमाणात उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने घाईघाईने निविदा प्रक्रिया का सुरू केली, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"