फक्त मुद्द्याचं!

16th June 2026
पिंपरी-चिंचवड

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश!

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश!

शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मानधनावरील शिक्षक रुजू!
पिंपरी :नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मानधन शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, सर्व शिक्षक पूर्ण उत्साहाने शाळेत रुजू झाले आहेत. शिक्षकांची ही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी पिंपरी विधानसभा आमदार श्री. अण्णा बनसोडे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण मदतीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे यश शक्य झाले आहे.

viara vcc
viara vcc

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या पाठपुराव्याला यश; शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मानधन शिक्षक रुजू!
पिंपरी-चिंचवड:नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मानधन शिक्षकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून, सर्व शिक्षक पूर्ण उत्साहाने शाळेत रुजू झाले आहेत. शिक्षकांची ही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी पिंपरी विधानसभा आमदार श्री. अण्णा बनसोडे यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण मदतीमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे यश शक्य झाले आहे.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची मोलाची मदत
मानधन शिक्षकांच्या नियुक्तीबाबत प्रशासकीय पातळीवर काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि शिक्षकांना वेळेत न्याय मिळवून देणे आवश्यक होते. हीच गरज ओळखून आमदार अण्णा बनसोडे यांनी तातडीने या विषयात लक्ष घातले. त्यांनी स्वतः पालिका प्रशासनाकडे वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करून सर्व अडचणी दूर केल्या. त्यांच्या या खंबीर पुढाकारामुळेच शिक्षकांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सन्मानाने रुजू होता आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सकारात्मक सहकार्य
हा निर्णय वेळेत मार्गी लागण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक आणि तत्परतेने काम केले. यामध्ये अतिरिक्त आयुक्त बगाडे साहेब आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या उप-आयुक्त श्रीमती ममता शिंदे यांनी विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेवून तात्काळ आवश्यक त्या प्रशासकीय मंजुऱ्या दिल्या. अधिकाऱ्यांच्या या गतिमान आणि सहकार्याच्या भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे.

शिक्षक आणि पालकांकडून आभार व्यक्त
पहिल्याच दिवशी रुजू झाल्यानंतर सर्व मानधन शिक्षकांनी एकत्र येत विधानसभा उपाध्यक्षअण्णा बनसोडे यांचे विशेष आभार मानले. “आमदार बनसोडे मोलाच्या मध्यस्थीमुळे आज आमची नियुक्ती वेळेत झाली,” अशी कृतज्ञता शिक्षकांनी व्यक्त केली. तसेच या कामात प्रशासकीय पातळीवर मोलाचे योगदान देणारे अतिरिक्त आयुक्त बगाडे साहेब आणि उप-आयुक्त श्रीमती ममता शिंदे यांचेही शिक्षकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन पहिल्या दिवशी रुजू झालेल्या या शिक्षकांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांचा निकाल उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण लावण्याचा दृढ संकल्प केला आहे.

“विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि पालिका प्रशासनाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आम्हा सर्व शिक्षकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आम्ही सर्व जण मिळून यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांचा निकाल उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण लावण्यासाठी १००% प्रयत्न करू, असे मत मानधन शिक्षक वर्गाने व्यक्त केले.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडून जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही
गेली ३ वर्षे पगारवाढ झाली नसल्याने सर्व मानधन शिक्षकांनी पगारवाढीबाबत अत्यंत आशेने अपेक्षा व्यक्त केली आहे. शिक्षकांची ही मागणी रास्त असून विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विशेष लक्ष दिले आहे. “मानधन शिक्षकांना किमान वेतन देण्याबाबत सर्व सकारात्मक बाबी तपासून, माननीय महापौर आणि माननीय शिक्षण सभापती यांच्या विशेष सहकार्याने हा जिव्हाळ्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल आणि यावर तातडीने तोडगा काढला जाईल,” अशी खंबीर ग्वाही विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी शिक्षकांना दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"