फक्त मुद्द्याचं!

16th June 2026
पुणे

श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजनेतून १५९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य!

श्री कसबा गणपती विद्यार्थी दत्तक योजनेतून १५९ विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य!

पुणे, : पुण्याच्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि श्री कसबा गणपती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गेली २३ वर्षे राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थी दत्तक योजने अंतर्गत यावर्षी १५९ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शुल्क व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

viara vcc
viara vcc

हॉटेल सेंट्रल पार्क, शिवाजीनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार . हेमंत रासने, मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे तसेच शिक्षण समुपदेशक सौ. चैत्राली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या योजनेचा लाभ रमणबाग, हुजूरपागा, अहिल्यादेवी, नंदादीप, कर्वे संस्था, विमलाबाई गरवारे तसेच पुण्यातील इतर अनेक नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळाला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व, परिश्रम आणि सातत्य याविषयी मार्गदर्शन केले.

शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शाळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक सहाय्य मिळाले आहे. मागील वर्षी १२५ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता, तर यावर्षी १५९ विद्यार्थ्यांना शालेय शुल्क व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि विविध सहकाऱ्यांच्या योगदानामुळे हा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबविला जात असून, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भक्कम आधार ठरत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"