फक्त मुद्द्याचं!

18th May 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये “हरित व आत्मनिर्भर शहर” संकल्पनेची सुरुवात!

पिंपरी-चिंचवडमध्ये “हरित व आत्मनिर्भर शहर” संकल्पनेची सुरुवात!

पिंपरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी ऊर्जा बचत, स्वदेशी उत्पादनांचा वापर, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनाला तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांना प्रतिसाद देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये व्यापक स्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय महापौर रवि लांडगे यांनी घेतला आहे.

viara vcc
viara vcc

या संदर्भात महापौरांनी आयुक्तांना पत्राद्वारे सूचना देत महापालिका प्रशासन, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, शाळा, गृहनिर्माण संस्था, उद्योग आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून “हरित, ऊर्जा सक्षम आणि आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड” घडविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

महापौरांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे शहरात ऊर्जा बचत, इंधन बचत, पर्यावरण संरक्षण, स्वदेशी उत्पादनांना चालना, नागरिकांचा सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे प्रशासनातील दैनंदिन कामकाजातही पर्यावरणपूरक आणि खर्च बचतीच्या पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत “हरित पिंपरी-चिंचवड आठवडा”, “नो पॉवर अवर”, “एक कर्मचारी – एक वृक्ष”, ई-वाहन व चार्जिंग स्टेशन प्रोत्साहन, “वर्क फ्रॉम होम , व्हर्च्युअल मीटिंग” धोरण, “स्वदेशी बाजार – आत्मनिर्भर पीसीएमसी”, पेपरलेस प्रशासन, “ऑईल फ्री हेल्दी कॅन्टीन”, “सौर पिंपरी-चिंचवड” अभियान, “ग्रीन रेटिंग” स्पर्धा, “सायकल टू वर्क डे”, नैसर्गिक शेती व टेरेस गार्डन प्रोत्साहन तसेच “हरित गणेशोत्सव , हरित उत्सव” यांसारखे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की, “देश आणि राज्य नेतृत्वाने दिलेला ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश हा केवळ शासनाचा उपक्रम नसून तो प्रत्येक नागरिकाचा सहभाग असलेले जनआंदोलन व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. पिंपरी-चिंचवड शहर विकासासोबत पर्यावरण संरक्षणातही राज्यात आदर्श निर्माण करेल.”

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"