फक्त मुद्द्याचं!

5th May 2026
पिंपरी-चिंचवड

विजयाचा आनंद मोठा, पण चिमुकलीचे दुःख त्याहून मोठे!

विजयाचा आनंद मोठा, पण चिमुकलीचे दुःख त्याहून मोठे!

पिंपरी-चिंचवड भाजपने सामाजिक संवेदनशीलता जपली
​पिंपरी: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असतानाच, पिंपरी-चिंचवड शहर भाजपने मात्र आपली सामाजिक संवेदनशीलता जपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या मोठ्या विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष, फटाकेबाजी किंवा गुलाल उधळण न करता, मोरवाडी येथील मुख्य कार्यालयात अत्यंत साधेपणाने भारत माता व जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा विजय साजरा करण्यात आला.

vcc maharastra din
vcc maharastra din

​पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या दुर्दैवी अत्याचाराच्या घटनेमुळे शहर भाजपने हा संवेदनशील निर्णय घेतला. या घटनेचा निषेध व्यक्त करत आणि पीडितेबद्दल सहानुभूती दर्शवत पक्षाने सर्व नियोजित उत्सवी कार्यक्रम रद्द केले. मोरवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात पश्चिम बंगालमधील विजयाचे स्वागत केवळ भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मातेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.

​शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी खासदार अमर साबळे, आमदार उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सदाशिव खाडे, सरचिटणीस मधुकर बच्चे, वैशाली खाडये यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की, बंगालमधील विजय हा लोकशाहीचा आणि विकासाच्या राजकारणाचा विजय आहे, मात्र पुण्यातील त्या घटनेमुळे मन सुन्न झाले असून अशा परिस्थितीत जल्लोष करणे योग्य नाही, म्हणूनच साधेपणाने हा दिवस पाळण्यात आला.

​याप्रसंगी राजेश पिल्ले, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, राजू दुर्गे, सुरेश भोईर, मंदार देशपांडे, पल्लवी वाल्हेकर, संजय पटणी, विजय सिनकर, नेताजी शिंदे, नंदू कदम, देवदत्त लांडे, प्रकाश जवळकर, संजीविनी पांडे, पोपट हजारे, युवराज लांडे, निलेश अष्टेकर, शितल कुंभार, संतोष भालेराव, गोरख कुंभार, गणेश ढाकणे, अजित भालेराव यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाहीतील विजयाचा आदर करतानाच सामाजिक दुःखात सहभागी होऊन भाजपने शहरवासीयांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"