फक्त मुद्द्याचं!

17th April 2026
पिंपरी-चिंचवड

रावेत येथील हाउसिंग सोसायटीचे सांडपाणी थेट पवना नदीत!

रावेत येथील हाउसिंग सोसायटीचे सांडपाणी थेट पवना नदीत!

सोसायटीला एक लाखाचा दंड
पिंपरी : सोसायटीचा मैला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद ठेवून थेट पवना नदीत सांडपाणी सोडणाऱ्या रावेत तेथील एका हाऊसिंग सोसायटीवर महापालिकेने कारवाई केली आहे. पर्यावरण विभागाच्या पथकाने एक लाख 2500 रुपयांचा दंड सोसायटीला आकारला आहे. सात दिवसात दंड न भरल्यास पाण्याचे नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा दिला आहे .

viara vcc
viara vcc

पवना नदीत थेट सांडपाणी सोडण्यात येत आहे. याबाबत पालिकेच्या पर्यावरण विभागाला एक तक्रार प्राप्त झाली होती. याची दखल घेऊन पर्यावरण पथकाने संबंधित जागेवर जाऊन तपासणी केली असता मैलासांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्याचे आढळून आले सोसायटीमधील सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात होते. रावेत येथील 345 सदनिका असलेली ही मोठी सोसायटी आहे. पवना नदीत सोडण्यात येत असलेले सांडपाणी पर्यावरण विभागाने बंद केले आहे. सोसायटी धारकांनी सात दिवसात दंड न भरल्यास पाण्याचे नळ जोड बंद करण्याचा इशारा पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सोसायटीला दिला आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष
शहरात 5000 पेक्षा जास्त हाऊसिंग सोसायटी आहेत. त्यापैकी बहुतांश सोसायट्यांनी नावापुरते मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. परंतु ते सतत बंद असतात त्यामुळे बंद प्रकल्पातील सांडपाणी थेट मुळा, पवना, इंद्रायणी या नद्यांमध्ये सोडले जाते. यामुळे या नद्यांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. ही कारवाई महापालिकेने आम्ही काम करतोय असे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे. रावेत येथील हाउसिंग सोसायटीचे सांडपाणी थेट पवना नदीत सोसायटीला एक लाखाचा दंड

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"