फक्त मुद्द्याचं!

14th April 2026
गुन्हेगारी

तीन सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त!

तीन सराईत गुन्हेगारांकडून दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त!

संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याची कारवाई
पिंपरी : गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुस व एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे ,अशी माहिती संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांनी दिली.

viara vcc
viara vcc

याप्रकरणी दीपक भास्कर बर्फे (वय 26, रा. रामनगर गल्ली नंबर एक, सिद्धिविनायक अपार्टमेंट, फ्लॅट नंबर 10, पिंपळे गुरव), अतुल बबन भालेराव (वय 31, जय भीम नगर, वार्ड नंबर तीन, दापोडी), मुकेश राम काची (वय 26, सिद्धार्थनगर, दापोडी) यांना एच. ए. ग्राउंड संत तुकाराम नगर या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुस व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख दोन हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस निरीक्षक गुन्हे गोरख कुंभार, पोलीस उपनिरीक्षक विनायक पाटील, पोलीस अंमलदार यांनी केली आहे. प्रकरणी संत तुकाराम पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनायक पाटील हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"