फक्त मुद्द्याचं!

14th April 2026
गुन्हेगारी

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू!

अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू!

पिंपरी : अवजड वाहनांना प्रवेश बंदी असलेल्या वेळेत नियम धाब्यावर बसवून टेम्पो चालविल्याने हिंजवडी परिसरात अवजड वाहनाच्या धडकेत 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार 11 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास माण रोड, भारत पेट्रोलियम पंपाजवळ घडली.

याबाबत रवींद्र पांडुरंग कुंभारे (वय 53, शेषनगर, खरबी रोड, नागपूर )यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक दिलीप मधुकर वाकचौरे (रा. घाटकोपर पश्चिम याला अटक केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी आयटी परिसरात जड वाहनांना प्रवेश बंदीसाठी वेळ ठरवून दिली आहे. तरी देखील हे नियम धाब्यावर बसवून अवजड वाहने घुसखोरी करतात. याचा परिणाम अपघातात होतो. फिर्यादी यांचा मुलगा यश कुंभारे हा आपल्या मोपेड वरून जात असताना आरोपीने जड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही टेम्पो त्या मार्गावर आणला. भरधाव वाहन चालविल्याने यशच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

हातभट्टी दारूसाठी लागणारे गुळमिश्रित रसायन जप्त
पिंपरी : मुंबई- पुणे एक्सप्रेस लगत मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन साठवून ठेवणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गूळ मिश्रित रसायन जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवार बारा एप्रिल रोजी गोल्ड साईन मीडिया. होर्डिंग जवळ करण्यात आली.

याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई, सुभाष गुरव यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मलिका वजीर राठोड (वय 28, रा. शिरगाव,मावळ) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला बेकायदेशीररित्या हातभट्टी दारूसाठी लागणारे कच्चे रसायन तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून 52हजार 500 रूपये किंमतीचे सुमारे दीड हजार लिटर रसायन जप्त करण्यात आले. शिरगाव पोलीस तपास करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"