फक्त मुद्द्याचं!

14th April 2026
पिंपरी-चिंचवड

पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन सवलत!

पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन सवलत!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत सामान्य करावर विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. कर आकारणी आणि कर संकलन विभागाच्या या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना ‘पर्यावरणपूरक’ जीवनशैली अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

viara vcc
viara vcc

कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया आणि झिरो वेस्ट संकल्पना प्रभावीपणे राबवणाऱ्या इमारतींना करात थेट सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संगोपन करताना नागरिकांना आर्थिक दिलासाही मिळणार आहे.

अशा मिळणार सवलती
ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असल्यास – ५% सवलत, ऑनसाइट कंपोस्टिंग एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ८% सवलत, फक्त एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास ३% सवलत, झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास ८% सवलत, झिरो वेस्ट तसेच एस.टी.पी प्लँट कार्यान्वित असल्यास १०% सवलत

महापालिकेच्या या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतींना कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी पुनर्वापर करण्यास सोसायटीना प्रेरणा मिळणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, पर्यावरणपूरक उपाययोजना राबवणाऱ्या इमारतींना प्रोत्साहन देणे हा या सवलती मागील मुख्य उद्देश असून, नागरिकांनी ऑनसाइट कंपोस्टिंग, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी) आणि झिरो वेस्ट संकल्पना स्वीकारल्यास शहरातील कचरा व्यवस्थापनास आणखी बळ मिळेल.

पिंपरी चिंचवड आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. कर सवलतींच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्यास प्रोत्साहन मिळेल आणि ‘ग्रीन सिटी’चा संकल्प अधिक बळकट होईल.

पर्यावरणपूरक सुविधा उभारणाऱ्या इमारतींना करात सवलत देण्याची ही योजना शहराला स्वच्छ, हरित आणि शाश्वत बनविण्याकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. नागरिकांनी या सवलतींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभाराव्यात आणि पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"