फक्त मुद्द्याचं!

5th April 2026
पिंपरी-चिंचवड

पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नव्याने पाच पोलीस ठाणी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव!

पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नव्याने पाच पोलीस ठाणी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव!

पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी व देहूगाव येथे पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नव्याने पाच पोलीस ठाणी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस महासंचालकांना दिला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ पोलीस मदत व सुविधा मिळावी यासाठी बावधन, हिंजवडी, सांगवी, एमआयडीसी भोसरी, दिघी, चिखली आणि देहूरोड या पोलीस ठाण्याचे विभाजन करून नव्याने पिरंगुट, जांबे, पिंपळे सौदागर, मोशी व देहूगाव अशी पाच पोलीस ठाणी नव्याने निर्माण करण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे .

viara vcc
viara vcc

याशिवाय नव्याने निर्माण करण्यात आलेल्या परिमंडल चार करिता पोलीस उपायुक्त आणि इतर पदे मंजूर नसल्याने त्यासाठीचाही स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेस 17 पोलीस ठाणी, चार पोलीस विभाग, दोन परिमंडळ होते .सध्या 23 पोलीस ठाणे, आठ पोलीस विभाग, चार परिमंडळ निर्माण केली आहेत.

कामकाजामध्ये सुसूत्रता यावी यासाठी प्रादेशिक विभागासाठी एक स्वतंत्र अप्पर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, वाहतूक शाखा, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा परिमंडळ 3 व गुन्हे शाखा यांच्यासाठी स्वतंत्र पाच पोलीस उपायुक्त आणि दहा सहाय्यक पोलीस आयुक्त पद निर्माण केले. राज्याच्या गृहमंत्रालयाने नवीन पाच पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव मान्य केल्यास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कक्षेत 28 पोलीस ठाणी निर्माण होतील.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"