फक्त मुद्द्याचं!

1st June 2026
गुन्हेगारी

देहूरोड येथील ज्वेलर्स दुकानदाराने ग्राहकांना घातला साडे 26 लाखांचा गंडा!

देहूरोड येथील ज्वेलर्स दुकानदाराने ग्राहकांना घातला साडे 26 लाखांचा गंडा!

पिंपरी : सोन्याचे नवीन दागिने व रिपेरिंग साठी रोख रक्कम, सोन्याचे दागिने मोड असे एकूण 26 लाख 60 हजार 150 रुपये किमतीचे दागिने व 657 ग्रॅम सोन्याचे दागिने विश्वासाने दिले असता ज्वेलर्स दुकानदाराने फसवणूक केली आहे. ही घटना एक जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सुन्धा ज्वेलर्स, सुभाष चौक, मेन बाजार देहूरोड येथे घडली.

viara vcc
viara vcc

या प्रकरणी एका व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अंबालाल जिवाजी सोनी (वय 56), रोहित अंबालाल सोनी (वय 30 ,दोघेही रा. विकासनगर, किवळे )अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी आरोपी व इतर साक्षीदारांनी सोन्याचे दागिने रिपेरिंगसाठी तसेच नवीन सोने दागिने तयार करण्यासाठी रक्कम तसेच सोन्याच्या दागिन्याची मोड असे एकूण 26 लाख 60 हजार 150 रुपये किंमतीचे व 657 ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी विश्वासाने दिले होते. आरोपींनी फिर्यादी तसेच अन्य नागरिकांचे रिपेअरसाठी दिलेले सोन्याचे दागिने, नवीन दागिने व रोख रक्कम परत न करता फिर्यादी सारख्याच अन्य 40 व इतर आणखी काही लोकांची फसवणूक करून ज्वेलर्स दुकानदार दुकान बंद करून पळून गेला आहे. देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डोंगळे हे तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"