फक्त मुद्द्याचं!

6th March 2026
पिंपरी-चिंचवड

“पोलीस आयुक्तांची भेट”; पूर्व परवानगी किंवा शिफारस न घेता ठराविक वेळेत थेट भेट!

“पोलीस आयुक्तांची भेट”; पूर्व परवानगी किंवा शिफारस न घेता ठराविक वेळेत थेट भेट!

पिंपरी : नागरिकांना कोणतीही पूर्व परवानगी किंवा शिफारस न घेता ठराविक वेळेत थेट “पोलीस आयुक्तांची भेट” या उपक्रमाद्वारे घेता येणार आहे. पोलीस प्रशासन अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. “पोलीस आयुक्तांची भेट” या उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निवारण आणि पोलीस प्रशासनाशी थेट संवादाची दारे या उपक्रमामुळे खुली करण्यात आली आहेत.

viara vcc
viara vcc

या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटून आपली मते, सूचना आणि तक्रारी मांडता येणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत जनसहभाग वाढवणे, तक्रार निवारण प्रक्रियेला वेग देणे आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करणे हा या उपक्रमा मागील उद्देश आहे. प्रत्येक सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत चिंचवड प्रेम लोक पार्क परिसरातील पोलीस आयुक्त कार्यालयात हा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

यावेळी पोलीस आयुक्तांसह सहाय्यक पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपयुक्त उपस्थित राहणार आहेत. नागरिकांच्या सूचना व समस्या तात्काळ ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी विशेष यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच शहरात येणाऱ्या अभ्यागतांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"