फक्त मुद्द्याचं!

15th February 2026
पिंपरी-चिंचवड

औद्योगिक क्रीडा मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद टाटा मोटर्स संघाने पटकाविले!

औद्योगिक क्रीडा मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद टाटा मोटर्स संघाने पटकाविले!

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या मर्यादित २० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद टाटा मोटर्स अ संघांने पटकाविले तर टाटा टेक्नॉलॉजी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.या स्पर्धेमध्ये एकूण चार शतके झळकावली गेली.एका हॅट्रिकचीही नोंद झाली.टाटा मोटर्स अ संघांने 38 धावांनी विजय मिळविला. अंतिम सामन्याचा सामनावीर मनोज जराड ठरला. विजेत्या टाटा मोटर्स अ संघास महेंद्र वडजे व राजेंद्र नागेशकर यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली.

viara vcc
viara vcc

मर्यादित २० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत टाटा मोटर्स ब,क,केएसबी,एसएमआयटी मिंडा,ओएफडी आर,भारत फोर्ज,महिंद्रा सीएलपीएल,पीसीएमसी,टेट्रापॅक,अल्फा लावल,फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स,एसकेएफ,प्राज इंडस्ट्रीज,एचइ फॅक्टरी केबीएल,प्रीमियम ट्रान्समिशन,फ्लीटगार्ड फिल्टर्स,बजाज ऑटो ग्रीन,बजाज ऑटो ब्ल्यू,एमक्यूअर फार्मासिटिकल,थरमॅक्स,इमर्सन जेसीबी,सँडविक एशिया,पॉस्को,ॲटलास कॉपको,ईलिंनडब्ल्यूजी,टाटा टेक्नॉलॉजी,महेंद्रा अँड महिंद्रा,एसएचटी आयटी सोल्युशन्स,अम्यूनेशन फॅक्टरी इलेव्हन,अम्यूनेशन फॅक्टरी,एनप्रो,टीकेआयएल,फिलिप्स,म्युनिशन्स इंडिया,बजाज ऑटो चाकण,डीओडी,फॉरविया एकूण ४० कंपन्यांच्या संघानी भाग घेतला. सदर स्पर्धा टाटा मोटर्स पिंपरी ,बजाज ऑटो आकुर्डी व अम्यूनेशन फॅक्टरी खडकी येथे झाल्या. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने झाली.या संपूर्ण स्पर्धेसाठी सामनावीर ट्रॉफी,एम्क्युअर फार्मसिटीकल्स यांनी तर टी शर्ट टाटा टेक्नॉलॉजिज आईगेटइटने दिले.

टाटा मोटर्स “अ” विरुद्ध टाटा टेक्नॉलॉजी यांतील अंतिम सामन्याची सुरुवात टाटा मोटर्सचे सीनियर जनरल मॅनेजर महेंद्र वडजे यांनी नाणेफेक करून केली;या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की औद्योगिक क्रीडा संघटनेच्या स्पर्धा कामगारांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी आहेत.हे तणाव मुक्त होण्याचे साधन आहे.

या स्पर्धेचे पारितोषक वितरण औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर व टाटा मोटर्सचे सीनियर जनरल मॅनेजर महेंद्र वडजे यांच्या हस्ते झाले या प्रसंगी बोलताना राजेंद्र नागेशकर म्हणाले की विविध संघाना एकत्र आणून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजकांचा कस लागतो. खेळाडूंचा पाठिंबा हीच त्यांची मोठी ताकद असते

या स्पर्धेची उपविजेती ट्रॉफी टाटा टेक्नॉलॉजी संघाला एन.डी.कदम व वसंत ठोंबरे यांच्या तर उत्कृष्ट खेळाडू मनोज जराड यांना विजय हिंगे व नितीन कदम यांच्या हस्ते,उत्कृष्ट फलंदाज पंकज वाघचौरे यांना हरी देशपांडे व शशिकांत कात्रे यांच्या हस्ते तर उत्कृष्ट गोलंदाज विश्वेश्वर भट यांना सचिन कांबळे व आनंदा खेडेकर यांच्या हस्ते देण्यात आली तर याप्रसंगी उत्कृष्ट गोलंदाजासाठी बजाज ऑटो आकुर्डीच्या ललित पांडे यांनी जाहीर केलेले कै.अजय गोधडे यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषकही देण्यात आले.याप्रसंगी बजाज ऑटोचे लोहार व सतीश जाधव हेही उपस्थित होते.. औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, वसंत ठोंबरे विजय हिंगे, हरी देशपांडे,सँडविक एशिया स्पोर्ट्स कमिटीचे दुष्यंत गायकवाड,जेसीबी स्पोर्ट्स कमिटीचे सचिन कांबळे,बजाज ऑटोचे लोहार व सतीश जाधव,आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम,टाटा मोटर्स युनियनचे शामराव घावटे,आनंदा खेडेकर,टाटा मोटर्सचे स्पोर्ट्स ऑफिसर नितीन कदम,सतीश मोटे (टाटा मोटर्स),ज्येष्ठ खेळाडू चंद्रशेखर चौधरी, ,मुकेश गुजराथी,रियाज उतावळे,संदीप आहेर,मंदार कुलकर्णी(उत्कर्ष क्रीडा अकॅडमी) उपस्थित होते.

या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औद्योगिक क्रीडा संघटनेचे खजिनदार प्रदीप वाघ यांनी तर आभार प्रदर्शन हरी देशपांडे यांनी केले.

धावफलक
टाटा मोटर्स अ २० षटके ५ बाद १५२ धावा:- मनोज जराड ५५ अमोल कायगुडे १९ अक्षय भगत २० स्वप्निल मुंगेल २3-3.
टाटा टेक्नॉलॉजी २० षटके ८ बाद ११४ धावा:- स्वप्नील मुंगेल १५ आदिल हुसेन १५ कश्यप के २२ मनोज जराड २९-२ यशवंत कांबिरे २४-3.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"