Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

15th September 2026
पिंपरी-चिंचवड

गणेशोत्सव काळात शहरात 2 हजार 727 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त!

गणेशोत्सव काळात शहरात 2 हजार 727 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त!

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराततील गणेशोत्सव काळात आणि विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडाव्यात यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा सुरक्षा बंदोबस्त उभारला आहे. यासाठी 2 हजार 727 पोलीस अधिकारी -कर्मचारी मैदानात उतरवले असून त्यांच्या मदतीला 550 होमगार्ड, एसआरपीएफच्या दोन प्लाटूनसह विविध विशेष पथके ही तैनात करण्यात आली आहेत.

viara vcc
viara vcc

गणेश मूर्तीचे आगमन आणि दर्शनासाठी होणारी गर्दी व विसर्जन मिरवणुका या सर्व टप्प्यांसाठी स्वतंत्र सुरक्षा नियोजन करण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणी, प्रमुख चौक, संवेदनशील परिसर आणि विसर्जन मार्गावर अतिरिक्त लक्ष देण्यात येणार आहे. बंदोबस्ताची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

indra dairy
indra dairy

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत यंदा 2 हजार 251 सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठी एक सह पोलीस आयुक्त, एक अप्पर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त आणि नऊ सहाय्यक पोलीस आयुक्त उत्सव काळातील सुरक्षा व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यांच्यासोबत 64 पोलीस निरीक्षक, 291 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक कार्यरत राहणार आहेत. प्रत्यक्ष बंदोबस्ताचा मुख्य भाग 2 हजार 355 पोलीस अंमलदारांवर राहणार आहे.

उत्सव काळात कोणतीही आपत्यकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ प्रतिसाद देता यावा यासाठी एसआरपीएफच्या दोन प्लाटून राखीव ठेवण्यात आल्या आहेत. बॉम्बशोधक व नाशक पथकाची एक तुकडी चार आरसीपी आणि 17 स्ट्रायकिंग पथकेही तयार ठेवण्यात आली आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"