प्रेरणा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!

सभासदांना 11 टक्के लाभांश जाहीर
पिंपरी : प्रेरणा को- ऑफ बँकेची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न झाली. सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सभासदांना 11 टक्के लाभांश देण्याची घोषणा बँकेचे चेअरमन कांतीलाल तुकाराम गुजर यांनी केली. बँकेने आर्थिक वर्षा अखेर 877.98 कोटीच्या एकूण व्यवसायाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याची माहिती त्यांनी दिली.

वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर यांनी वार्षिक अहवाल सादर करताना बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आणि भविष्यातील वाटचालीचा आढावा घेतला. सभेनंतर 75 व्या वर्षात पदार्पण केलेल्या सभासदांना ‘अमृत महोत्सवी मानपत्र’ तर वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांना ,प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार, देऊन सन्मानित करण्यात आले.

सभेस बँकेचे व्हाईस चेअरमन गबाजी वाकडकर संचालक श्रीधर वाल्हेकर, संतोष मुंगसे, अक्षय गुजर, जगन्नाथ शिवले, नंदकिशोर तोष्णीवाल, ॲड. अजित कुमार जाधव, राजाराम रंदिल, राजेंद्र शिरसाट, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण शेळके उपस्थित होते. संचालक श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक तर रेश्मा महाडिक व सपना नळकांडे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संतोष मुंगसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

